Saturday 24 September 2011

स्वास्थ्यवर्धक पालक टमाटो सूप (वेळ १० मिनिटे)


(पालकात  विटामिन ए, बी, सी ,कॅल्सियम, फास्फोरस इत्यादी   जीवनावश्यक घटक भरपूर असतात, शरीराची प्रतिरोध काश्मता वाढवणारे व रक्तालपता दूर करणारे)
टमाटर:   लाइकोपिन नावाचे  anti oxident व विटामिन ए,सी ,लौह इत्यादी जीवनरक्षक घटक -शरीराची प्रतिरोध क्षमता वाढविणारे. कच्चे खाण्या पेक्षा सूप अधिक उत्तम)

( सध्या पालक सहित हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर किटनाशक वापरले जाते   म्हणून  पालक वापरण्या आधी एका भांड्यात कोमट
पाण्याने दोन-तीनदा धुतले पाहिजे.
आवश्यक साहित्य :  पालक  २५० ग्रॅम , टमाटो  १०० ग्रॅम (२ किंवा ३),  जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे,  अदरक : छोटा तुकडा
 
वैकल्पित पदार्थ (असेल तर): लोणी १  चमचे व  १/२ चमचे जीरा 
 
कृती : पालक व टमाटो बारीक चिरून घ्यावा. गैस वर कुकर ठेवून , चिरलेला  पालक, टमाटो व अदरक   दोन वाट्या पाणी  घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)
थंड झाल्यावर कुकर मधून   पालक व टमाटो चे तुकडे काढून   मिक्सी मध्ये थंड पाणी घालून वाटून घ्या व  मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये  गाळून घ्या. ( ३ मिनिटे) 
भांड  गैस वर ठेऊन कुकर मध्ये उरलेलं पाणी,  जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन . एक उकळी आल्या वर गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे). 

लोणी आणि जिर्याची फोडणी दिल्यास स्वाद आणखीन वाढतो.
 
हिवाळ्यात गरमा-गरम पालक टमाटर सूप पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पालकात टमाटर घातल्या मुले लहान मुले ही हे पोष्टिक सूप आनंदाने पितात.
टीप : आवडत असल्यास नुसता पालकाचा सूप या पद्धतीने बनविता येतो. टमाटर एवजी सूप तैयार झाल्यावर लिंबाचा रस त्यात घातला तरीही हे सूप स्वादिष्ट बनते.

No comments:

Post a Comment