Saturday 15 October 2011

स्वास्थ्यवर्धक ग्रीन सूप / तोरई (दोडक्याचे) सूप (वेळ १० मिनिटे)


तोरईचे सूप! आश्चर्य वाटेल.  पण  ग्रीन सूप  या नावाने  हे सूप पिण्या साठी मुलांना दिले त्यांना अत्यंत आवडले. हे सूप तोरईचे  आहे हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. कधीही तोरई न खाणारे तोरईची  भाजीही आनंदाने खाऊ लागतील तर त्यात नवल नाही.   

(तोरईत विटामिन ए, बी, सी ,कॅल्सियम, रिबोफ्लाविन,थिअमिन , लौह, मग्नेसिउम इत्यादी   जीवनावश्यक घटक भरपूर असतात, शरीराची प्रतिरोध काश्मता वाढवणारे व रक्तालपता दूर करणारे,हृद्यरोगींसाठी अत्यंत लाभप्रद) 



**( सध्या  हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर किटनाशक वापरले जाते   म्हणून  तोरई वापरण्या आधी एका भांड्यात कोमट पाण्याने दोन-तीनदा धुतली  पाहिजे).  (चार कप सूपसाठी लागणारे साहित्य) 

आवश्यक साहित्य :  तोरई (तीन -चार)   २५० ग्रॅम ,   जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे,  अदरक : छोटा तुकडा , लोणी चार चमचे. 
वैकल्पित पदार्थ (असेल तर): तूप दोन चमचे, १/२ चमचे जिरे.   

 कृती :   तोरई चिरून घ्यावी.      गैस वर कुकर ठेवून , चिरलेला   तोरई  आणि अदरक,   दोन वाट्या पाणी  घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)
थंड झाल्यावर कुकर मधून    तोरईचे तुकडे काढून   मिक्सी मध्ये थोड  थंड पाणी घालून वाटून घ्या व  मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये  गाळून घ्या ( ३ मिनिटे).
 कुकर मध्ये उरलेलं पाणी ही त्यात मिसळा.  जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन  भांड  गैस वर ठेऊन  एक उकळी येऊ  ध्या.  गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे).  

कपात एक चमचा लोणी घालून सूप सर्व करा. 

टीप :  लोणी नसल्यास , तूप व जिर्याची फोडणी ही दिली तरी चालते. स्वादात काहीही फरक पडणार नाही. 

No comments:

Post a Comment