Wednesday 14 September 2011

दुधी भोपळा टमाटो सूप




दुधी भोपळा टमाटो सूप (वेळ १० मिनिटे)


(दुधी भोपळ्याचे सूप सहजासहजी मुल पिणार नाही पण त्यात टमाटो घातल्यास कोणालाही कळणार नाही हे दुधी भोपळ्याचे सूप आहे. )
  
आवश्यक साहित्य :  दुधी भोपळा  २५० ग्रॅम , टमाटो  १०० ग्रॅम (२ किंवा ३),  जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे.

वेकल्पिक साहित्य घरात असेल तर  लोणी १  चमचे व  कोथिंबीर  

कृती : दुधी भोपळा व टमाटो बारीक चिरून घ्यावा. गैस वर कुकर ठेवून , चिरलेला दुधी व टमाटो   दोन वाट्या पाणी  घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)

थंड झाल्यावर कुकर मधून   दुधी व टमाटो चे तुकडे काढून   मिक्सी मध्ये थंड पाणी घालून वाटून घ्या व  मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये  गाळून घ्या ( ३ मिनिटे) 

भांड   गैस वर ठेऊन कुकर मध्ये उरलेलं पाणी,  जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन . एक उकळी आल्या वर गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे) 

असेल तर एक चमचा लोणी व कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व करा. पोरांना निश्चित आवडेल. 

No comments:

Post a Comment