Saturday, 9 June 2012

लाल भोपळ्याचा परांठा (कोहळ्याचा)
 लाल भोपळ्यात रोग प्रतीकारी शक्ती वाढविणारे विटामिन अ,क,ई आणि पोटेसिअम , Beta-carotene, Fiber, Magnesium,Alpha-carotene,  इत्यादी पदार्थ असतात.  हृद्य रोग, केन्सर, त्वचा रोग इत्यादीं पासून आपले संरक्षण करण्यास मदद मिळते. कोहळ्याच्या भाजीच्या नावाने मुले दूर पाळतात पण हा परांठा त्यांना आवडेल. सांगितल नाही तर कुणाला कळणार ही नाही हा लाल भोपळ्याचा परांठा आहे. ताजाच कोहळा नेहमी वापरला पाहिजे. 
आवश्यक साहित्य : कोहळा १/२ किलो ,  तिखट  १-२  चमचे ,  हळद १/२ चमचे , कोथिंबीर १ जुडी , बारीक चिरलेली. मीठ  आवडीनुसार  व कणिक आवश्यकतेनुसार , तेल किंवा तूप  ४-५ चमचे. 
 वैकल्पित पदार्थ (असेल तर):  धनिया पावडर, जीरा पावडर, काळी मिरी पावडर (तिखटा एवजी),  हिरवी मिरची बारीक चिरलेली २ - ३, चाट मसाला  कृती :  एका परातीत  कोहळ किसून घ्यावे, त्यात तिखट, हळद,  मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर व  पीठ मळण्यासाठी आवश्यक  कणिक  मिसळावी,   मीठ टाकल्यामुळे कोहळ्याला पाणी सुटते म्हणून पाणी मिसळण्याची आवश्यकता नाही. 

तव्यावर तूप किंवा तेल टाकून परांठा दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्या. 
हा परांठा टमाटरच्या सौस, हरव्या चटणी किंवा दह्या बरोबर खाता येतो. 

Saturday, 10 March 2012

उडीद गोळ्यांची भाजीउन्हाळा आल्यावर भाज्या दुर्मिळ होतात. अशावेळी  सारखा वरण भात करण्या एवजी डाळीची भाजी कशी करता येईल. या विचार वरून ही भाजी सुचली.


(कित्येकदा उन्हाल्यात करून बघितली  आहे, काल  शनिवारी ही करून बघितली होती. नवर्या पासून, पोरानाही आवडली. गृहणी असल्या मुळे परावलंबी. मला  टंकन किंवा  इंटरनेट चालविता येत. नाही, मुलांना  मराठी टंकन येत नाही आणि  ह्याचं ही म्हणण काही नवीन पदार्थ असेल तर मी वेळ देऊ शकतो)


आवश्यक साहित्य : उडीदाची डाळ - २ वाटी ,  तेल २-३ चमचे, लसून - १०-१२ पाकळ्या, खोबर १/४ , जीरा पावडर १/२ चमचा, हळद, १/२ चमचे, तिखट १ ते दोन चमचे , मोहरी १/२ चमचे, हिंग एक चुटकी , मीठ आवडीनुसार.

 कृती :   उडीदाच्या डाळीला तीन ते चार तास भिजत ठेवा. पाणी काठून मिक्सर वर वाटून घ्या. (वड्या करता वाटतो तशी), त्यात जीरा पावडर आणि थोड मीठ घालून फेटून घ्या.  


खोबर आणि लसुणाच्या पाकळ्या व तिखट एकत्रित मिक्सर मधे वाटून घ्या.


कढईत  २-३ चमचे तेल टाका, तेल गरम झाल्या वर मोहती व हिंग घाला. मोहरी फुटल्यावर, खोबर लसुणाच वाटण त्यात खाला. दोन मिनिटे तेलात परतल्यावर ,  दोन गिलास पाणी व आवडीनुसार मीठ त्यात घाला.  पाण्याला उकळी आल्यावर , उडीद  डाळीच्या वाटणाचे लहान- लहान गोळे त्यात घाला. (पाणी उकळत असल्या मुळे गोळे त्यात फुटणार नाहीत) . गोळे घालण झाल्या वर उरलेलं वाटण थोड पाणी घालून कढईत  घाला. दोन ते तीन मिनिटे उकळी आल्या वर गस बंद करा.


<strong>टीप: </strong>आवडत असल्यास  लसुण ,कांदा- टमाटोचे वाटण  खोबर्या एवजी घालू शकतात.  स्वादासाठी गोडा-मासला व इतर मसाले ही वापरू शकतात.

Saturday, 15 October 2011

स्वास्थ्यवर्धक ग्रीन सूप / तोरई (दोडक्याचे) सूप (वेळ १० मिनिटे)


तोरईचे सूप! आश्चर्य वाटेल.  पण  ग्रीन सूप  या नावाने  हे सूप पिण्या साठी मुलांना दिले त्यांना अत्यंत आवडले. हे सूप तोरईचे  आहे हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. कधीही तोरई न खाणारे तोरईची  भाजीही आनंदाने खाऊ लागतील तर त्यात नवल नाही.   

(तोरईत विटामिन ए, बी, सी ,कॅल्सियम, रिबोफ्लाविन,थिअमिन , लौह, मग्नेसिउम इत्यादी   जीवनावश्यक घटक भरपूर असतात, शरीराची प्रतिरोध काश्मता वाढवणारे व रक्तालपता दूर करणारे,हृद्यरोगींसाठी अत्यंत लाभप्रद) **( सध्या  हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर किटनाशक वापरले जाते   म्हणून  तोरई वापरण्या आधी एका भांड्यात कोमट पाण्याने दोन-तीनदा धुतली  पाहिजे).  (चार कप सूपसाठी लागणारे साहित्य) 

आवश्यक साहित्य :  तोरई (तीन -चार)   २५० ग्रॅम ,   जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे,  अदरक : छोटा तुकडा , लोणी चार चमचे. 
वैकल्पित पदार्थ (असेल तर): तूप दोन चमचे, १/२ चमचे जिरे.   

 कृती :   तोरई चिरून घ्यावी.      गैस वर कुकर ठेवून , चिरलेला   तोरई  आणि अदरक,   दोन वाट्या पाणी  घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)
थंड झाल्यावर कुकर मधून    तोरईचे तुकडे काढून   मिक्सी मध्ये थोड  थंड पाणी घालून वाटून घ्या व  मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये  गाळून घ्या ( ३ मिनिटे).
 कुकर मध्ये उरलेलं पाणी ही त्यात मिसळा.  जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन  भांड  गैस वर ठेऊन  एक उकळी येऊ  ध्या.  गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे).  

कपात एक चमचा लोणी घालून सूप सर्व करा. 

टीप :  लोणी नसल्यास , तूप व जिर्याची फोडणी ही दिली तरी चालते. स्वादात काहीही फरक पडणार नाही. 

Saturday, 24 September 2011

स्वास्थ्यवर्धक पालक टमाटो सूप (वेळ १० मिनिटे)


(पालकात  विटामिन ए, बी, सी ,कॅल्सियम, फास्फोरस इत्यादी   जीवनावश्यक घटक भरपूर असतात, शरीराची प्रतिरोध काश्मता वाढवणारे व रक्तालपता दूर करणारे)
टमाटर:   लाइकोपिन नावाचे  anti oxident व विटामिन ए,सी ,लौह इत्यादी जीवनरक्षक घटक -शरीराची प्रतिरोध क्षमता वाढविणारे. कच्चे खाण्या पेक्षा सूप अधिक उत्तम)

( सध्या पालक सहित हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर किटनाशक वापरले जाते   म्हणून  पालक वापरण्या आधी एका भांड्यात कोमट
पाण्याने दोन-तीनदा धुतले पाहिजे.
आवश्यक साहित्य :  पालक  २५० ग्रॅम , टमाटो  १०० ग्रॅम (२ किंवा ३),  जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे,  अदरक : छोटा तुकडा
 
वैकल्पित पदार्थ (असेल तर): लोणी १  चमचे व  १/२ चमचे जीरा 
 
कृती : पालक व टमाटो बारीक चिरून घ्यावा. गैस वर कुकर ठेवून , चिरलेला  पालक, टमाटो व अदरक   दोन वाट्या पाणी  घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)
थंड झाल्यावर कुकर मधून   पालक व टमाटो चे तुकडे काढून   मिक्सी मध्ये थंड पाणी घालून वाटून घ्या व  मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये  गाळून घ्या. ( ३ मिनिटे) 
भांड  गैस वर ठेऊन कुकर मध्ये उरलेलं पाणी,  जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन . एक उकळी आल्या वर गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे). 

लोणी आणि जिर्याची फोडणी दिल्यास स्वाद आणखीन वाढतो.
 
हिवाळ्यात गरमा-गरम पालक टमाटर सूप पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पालकात टमाटर घातल्या मुले लहान मुले ही हे पोष्टिक सूप आनंदाने पितात.
टीप : आवडत असल्यास नुसता पालकाचा सूप या पद्धतीने बनविता येतो. टमाटर एवजी सूप तैयार झाल्यावर लिंबाचा रस त्यात घातला तरीही हे सूप स्वादिष्ट बनते.
pub-4727831505084732.

Wednesday, 14 September 2011

दुधी भोपळा टमाटो सूप
दुधी भोपळा टमाटो सूप (वेळ १० मिनिटे)


(दुधी भोपळ्याचे सूप सहजासहजी मुल पिणार नाही पण त्यात टमाटो घातल्यास कोणालाही कळणार नाही हे दुधी भोपळ्याचे सूप आहे. )
  
आवश्यक साहित्य :  दुधी भोपळा  २५० ग्रॅम , टमाटो  १०० ग्रॅम (२ किंवा ३),  जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे.

वेकल्पिक साहित्य घरात असेल तर  लोणी १  चमचे व  कोथिंबीर  

कृती : दुधी भोपळा व टमाटो बारीक चिरून घ्यावा. गैस वर कुकर ठेवून , चिरलेला दुधी व टमाटो   दोन वाट्या पाणी  घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)

थंड झाल्यावर कुकर मधून   दुधी व टमाटो चे तुकडे काढून   मिक्सी मध्ये थंड पाणी घालून वाटून घ्या व  मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये  गाळून घ्या ( ३ मिनिटे) 

भांड   गैस वर ठेऊन कुकर मध्ये उरलेलं पाणी,  जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन . एक उकळी आल्या वर गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे) 

असेल तर एक चमचा लोणी व कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व करा. पोरांना निश्चित आवडेल. 

Sunday, 21 August 2011

मा की दाल/ साबूत उडीदाची डाळ

( उडीद डाळ-  पारंपारिक मसाले वापरून, कमी तेलात व कमी वेळात कशी करायची). 

जास्तीसजास्त वीस ते पंचवीस   मिनट
साहित्य  
उडीद डाळ                      - एक वाटी 
चना डाळ                       -  १/४ वाटी 
राजमा                           -  १/४ वाटी 

कांदे                                - दोन मध्यम आकाराचे
लसुण                            - ६-८ पाकळ्या  
मोठी विलायची               -  २-३ 
लवंग                            - ३-४
काळी मिरी                     - ८-१० 
तमालपत्र                       -  १ 
दालचीनी                       -  एक छोटा तुकडा     
दूध                               -  एक ग्लास (२०० ग्रॅम अंदाजे)     
मीठ                              -  स्वादानुसार 
तेल                               -  दोन चमचे 
जिरे                               - १/२ चमचे 

(उडीद , राजमा आणि चना डाळ, चार वाटी पाणी   टाकून १०-१२  भिजवून ठेवा, सकाळी करायची असेल तर रात्री भिजवलेली उत्तम)

कृती 

सर्व खडा मसाला अर्थात -लवंग, मोठी विलायची, काळी मिरी, दालचीनी  व तमालपत्र  मिक्सर मधे वाटून ध्या. कांदे व लसून बारीक चिरून ठेवा. (पाच मिनट 

भिजवलेल्या डाळी, कांदा लसुण व वाटलेला मसाला एकत्र मिसळून व दूध टाकून  एक कुकर मधे शिजायला ठेवा.  - वेळ पंधरा मिनुटे.  कुकर थंड झाल्या वर ( ३-4 मिनट  ) 
तेल व जिर्याची फोडणी घाला. स्वादानुसार मीठ टाकून एक उकळी ध्या.( दोन मिनट)   
डाळ घट्ट वाटल्यास पाणी-किंवा दूध मिसळता येते. 

टीप : खडा मसाला वाटून टाकल्यास -मसाला ही कमी लागतो आणि स्वाद ही उत्तम येतो. दूध नसल्यास नुसत पाणी टाकून ही डाळ उत्तम बनते.  ही डाळ तंदुरी रोटी, नान , भात व चपाती सोबत ही उत्तम लागते.