Saturday 9 June 2012

लाल भोपळ्याचा परांठा (कोहळ्याचा)




 लाल भोपळ्यात रोग प्रतीकारी शक्ती वाढविणारे विटामिन अ,क,ई आणि पोटेसिअम , Beta-carotene, Fiber, Magnesium,Alpha-carotene,  इत्यादी पदार्थ असतात.  हृद्य रोग, केन्सर, त्वचा रोग इत्यादीं पासून आपले संरक्षण करण्यास मदद मिळते. 



कोहळ्याच्या भाजीच्या नावाने मुले दूर पाळतात पण हा परांठा त्यांना आवडेल. सांगितल नाही तर कुणाला कळणार ही नाही हा लाल भोपळ्याचा परांठा आहे. ताजाच कोहळा नेहमी वापरला पाहिजे. 
आवश्यक साहित्य : कोहळा १/२ किलो ,  तिखट  १-२  चमचे ,  हळद १/२ चमचे , कोथिंबीर १ जुडी , बारीक चिरलेली. मीठ  आवडीनुसार  व कणिक आवश्यकतेनुसार , तेल किंवा तूप  ४-५ चमचे. 
 वैकल्पित पदार्थ (असेल तर):  धनिया पावडर, जीरा पावडर, काळी मिरी पावडर (तिखटा एवजी),  हिरवी मिरची बारीक चिरलेली २ - ३, चाट मसाला  कृती :  एका परातीत  कोहळ किसून घ्यावे, त्यात तिखट, हळद,  मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर व  पीठ मळण्यासाठी आवश्यक  कणिक  मिसळावी,   मीठ टाकल्यामुळे कोहळ्याला पाणी सुटते म्हणून पाणी मिसळण्याची आवश्यकता नाही. 

तव्यावर तूप किंवा तेल टाकून परांठा दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्या. 
हा परांठा टमाटरच्या सौस, हरव्या चटणी किंवा दह्या बरोबर खाता येतो. 

Saturday 10 March 2012

उडीद गोळ्यांची भाजी







उन्हाळा आल्यावर भाज्या दुर्मिळ होतात. अशावेळी  सारखा वरण भात करण्या एवजी डाळीची भाजी कशी करता येईल. या विचार वरून ही भाजी सुचली.


(कित्येकदा उन्हाल्यात करून बघितली  आहे, काल  शनिवारी ही करून बघितली होती. नवर्या पासून, पोरानाही आवडली. गृहणी असल्या मुळे परावलंबी. मला  टंकन किंवा  इंटरनेट चालविता येत. नाही, मुलांना  मराठी टंकन येत नाही आणि  ह्याचं ही म्हणण काही नवीन पदार्थ असेल तर मी वेळ देऊ शकतो)






आवश्यक साहित्य : उडीदाची डाळ - २ वाटी ,  तेल २-३ चमचे, लसून - १०-१२ पाकळ्या, खोबर १/४ , जीरा पावडर १/२ चमचा, हळद, १/२ चमचे, तिखट १ ते दोन चमचे , मोहरी १/२ चमचे, हिंग एक चुटकी , मीठ आवडीनुसार.





 कृती :   उडीदाच्या डाळीला तीन ते चार तास भिजत ठेवा. पाणी काठून मिक्सर वर वाटून घ्या. (वड्या करता वाटतो तशी), त्यात जीरा पावडर आणि थोड मीठ घालून फेटून घ्या.  


खोबर आणि लसुणाच्या पाकळ्या व तिखट एकत्रित मिक्सर मधे वाटून घ्या.


कढईत  २-३ चमचे तेल टाका, तेल गरम झाल्या वर मोहती व हिंग घाला. मोहरी फुटल्यावर, खोबर लसुणाच वाटण त्यात खाला. दोन मिनिटे तेलात परतल्यावर ,  दोन गिलास पाणी व आवडीनुसार मीठ त्यात घाला.  पाण्याला उकळी आल्यावर , उडीद  डाळीच्या वाटणाचे लहान- लहान गोळे त्यात घाला. (पाणी उकळत असल्या मुळे गोळे त्यात फुटणार नाहीत) . गोळे घालण झाल्या वर उरलेलं वाटण थोड पाणी घालून कढईत  घाला. दोन ते तीन मिनिटे उकळी आल्या वर गस बंद करा.


<strong>टीप: </strong>आवडत असल्यास  लसुण ,कांदा- टमाटोचे वाटण  खोबर्या एवजी घालू शकतात.  स्वादासाठी गोडा-मासला व इतर मसाले ही वापरू शकतात.