Saturday 26 March 2011

झटपट टमाटर सूप





झटपट टमाटर सूप  ( लागणारा वेळ जास्तीसजास्त १० मिनिटे ) 


संध्याकाळी  घरी आल्यावर चहा  एवजी गरमागरम सूप तेवढ्याच वेळात पटकन करून दिले तर ह्यांना ते आवडतेही आणि भूक ही वाढते. 
चार कप सूपसाठी लागणारे साहित्य 
साहित्य 

टमाटर (लाल)  ( १25 ग्रॅम) - चार
काळी मिरी पिसलेली         - १/२ चमचे 
जीरा पावडर                      - १/२ चमचे
मीठ                                  -  १/२ चमचे / आवडीनुसार
  
वेकल्पिक साहित्य घरात असेल तर
अदरक असेल तर            -    १/4 इंच (किंवा एक चमचा किसलेला)
कोथिंबीर                         -    सजविण्यासाठी असेल तर 
गूळ/ साखर  (   टमाटर आंबड असतील तर)   -    आवडीनुसार
 

कृती  
 टमाटर कापून ,एक कप पाणी टाकून मिक्सर मध्ये जूस करून घ्या (वेळ ४ मिनिटे ) - दोन कप जूस तैयार होईल.   टमाटर मध्ये बिया जास्त असेल तर गाळून घ्या.
गैस वर भांड ठेवून  चार कप पाणी व केलेला जूस ओता. उकळी आल्यावर त्यात जीरा पावडर, काळीमिरी पावडर आणि मीठ टाका. थोड उकळू द्या. (वेळ ५  मिनिटे ).

गरमागरम स्वादिस्ट सूप  तैयार -.  आवडत असेल तर अदरक कोथिंबीर वापरू शकता.






No comments:

Post a Comment