( उडीद डाळ- पारंपारिक मसाले वापरून, कमी तेलात व कमी वेळात कशी करायची).
जास्तीसजास्त वीस ते पंचवीस मिनट
साहित्य
उडीद डाळ - एक वाटी
चना डाळ - १/४ वाटी
राजमा - १/४ वाटी
कांदे - दोन मध्यम आकाराचे
लसुण - ६-८ पाकळ्या
लसुण - ६-८ पाकळ्या
मोठी विलायची - २-३
लवंग - ३-४
काळी मिरी - ८-१०
तमालपत्र - १
दालचीनी - एक छोटा तुकडा
दूध - एक ग्लास (२०० ग्रॅम अंदाजे)
मीठ - स्वादानुसार
तेल - दोन चमचे
जिरे - १/२ चमचे
(उडीद , राजमा आणि चना डाळ, चार वाटी पाणी टाकून १०-१२ भिजवून ठेवा, सकाळी करायची असेल तर रात्री भिजवलेली उत्तम)
कृती
सर्व खडा मसाला अर्थात -लवंग, मोठी विलायची, काळी मिरी, दालचीनी व तमालपत्र मिक्सर मधे वाटून ध्या. कांदे व लसून बारीक चिरून ठेवा. (पाच मिनट )
भिजवलेल्या डाळी, कांदा लसुण व वाटलेला मसाला एकत्र मिसळून व दूध टाकून एक कुकर मधे शिजायला ठेवा. - वेळ पंधरा मिनुटे. कुकर थंड झाल्या वर ( ३-4 मिनट )
तेल व जिर्याची फोडणी घाला. स्वादानुसार मीठ टाकून एक उकळी ध्या.( दोन मिनट)
डाळ घट्ट वाटल्यास पाणी-किंवा दूध मिसळता येते.
टीप : खडा मसाला वाटून टाकल्यास -मसाला ही कमी लागतो आणि स्वाद ही उत्तम येतो. दूध नसल्यास नुसत पाणी टाकून ही डाळ उत्तम बनते. ही डाळ तंदुरी रोटी, नान , भात व चपाती सोबत ही उत्तम लागते.
No comments:
Post a Comment