Saturday, 9 June 2012

लाल भोपळ्याचा परांठा (कोहळ्याचा)
 लाल भोपळ्यात रोग प्रतीकारी शक्ती वाढविणारे विटामिन अ,क,ई आणि पोटेसिअम , Beta-carotene, Fiber, Magnesium,Alpha-carotene,  इत्यादी पदार्थ असतात.  हृद्य रोग, केन्सर, त्वचा रोग इत्यादीं पासून आपले संरक्षण करण्यास मदद मिळते. कोहळ्याच्या भाजीच्या नावाने मुले दूर पाळतात पण हा परांठा त्यांना आवडेल. सांगितल नाही तर कुणाला कळणार ही नाही हा लाल भोपळ्याचा परांठा आहे. ताजाच कोहळा नेहमी वापरला पाहिजे. 
आवश्यक साहित्य : कोहळा १/२ किलो ,  तिखट  १-२  चमचे ,  हळद १/२ चमचे , कोथिंबीर १ जुडी , बारीक चिरलेली. मीठ  आवडीनुसार  व कणिक आवश्यकतेनुसार , तेल किंवा तूप  ४-५ चमचे. 
 वैकल्पित पदार्थ (असेल तर):  धनिया पावडर, जीरा पावडर, काळी मिरी पावडर (तिखटा एवजी),  हिरवी मिरची बारीक चिरलेली २ - ३, चाट मसाला  कृती :  एका परातीत  कोहळ किसून घ्यावे, त्यात तिखट, हळद,  मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर व  पीठ मळण्यासाठी आवश्यक  कणिक  मिसळावी,   मीठ टाकल्यामुळे कोहळ्याला पाणी सुटते म्हणून पाणी मिसळण्याची आवश्यकता नाही. 

तव्यावर तूप किंवा तेल टाकून परांठा दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्या. 
हा परांठा टमाटरच्या सौस, हरव्या चटणी किंवा दह्या बरोबर खाता येतो. 

No comments:

Post a Comment