तोरईचे सूप! आश्चर्य वाटेल. पण ग्रीन सूप या नावाने हे सूप पिण्या साठी मुलांना दिले त्यांना अत्यंत आवडले. हे सूप तोरईचे आहे हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. कधीही तोरई न खाणारे तोरईची भाजीही आनंदाने खाऊ लागतील तर त्यात नवल नाही.
* (तोरईत विटामिन ए, बी, सी ,कॅल्सियम, रिबोफ्लाविन,थिअमिन , लौह, मग्नेसिउम इत्यादी जीवनावश्यक घटक भरपूर असतात, शरीराची प्रतिरोध काश्मता वाढवणारे व रक्तालपता दूर करणारे,हृद्यरोगींसाठी अत्यंत लाभप्रद)
**( सध्या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर किटनाशक वापरले जाते म्हणून तोरई वापरण्या आधी एका भांड्यात कोमट पाण्याने दोन-तीनदा धुतली पाहिजे). (चार कप सूपसाठी लागणारे साहित्य)
आवश्यक साहित्य : तोरई (तीन -चार) २५० ग्रॅम , जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे, अदरक : छोटा तुकडा , लोणी चार चमचे.
वैकल्पित पदार्थ (असेल तर): तूप दोन चमचे, १/२ चमचे जिरे.
कृती : तोरई चिरून घ्यावी. गैस वर कुकर ठेवून , चिरलेला तोरई आणि अदरक, दोन वाट्या पाणी घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)
थंड झाल्यावर कुकर मधून तोरईचे तुकडे काढून मिक्सी मध्ये थोड थंड पाणी घालून वाटून घ्या व मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये गाळून घ्या ( ३ मिनिटे).
कुकर मध्ये उरलेलं पाणी ही त्यात मिसळा. जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन भांड गैस वर ठेऊन एक उकळी येऊ ध्या. गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे).
कपात एक चमचा लोणी घालून सूप सर्व करा.
टीप : लोणी नसल्यास , तूप व जिर्याची फोडणी ही दिली तरी चालते. स्वादात काहीही फरक पडणार नाही.